मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचा काही दिवसांपूर्वीच आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्याशी साखरपुडा झाला. त्यामुळे सध्या परिणीती चर्चेत आली आहे. नुकतेच परिणीती मुंबईतील एका कार्यक्रमानंतर स्पॉट झाली. मात्र यावेळी तिने पापाराझींना पोज देण्यास नकार दिला. त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
मुंबईत एका कार्यक्रमात परिणीती चोप्रा सहभागी झाली होती. त्यानंतर तेथून परतत असताना पापाराझींना पाहून परिणीतीला राग आला. त्यावेळी तिने पापाराझींना फोटो देण्यास नकार दिला. ‘थांबा’ असे म्हणत ती मागे वळून उभी राहिल्याचे दिसते. यावेळी परिणीतीची टीम पापाराझींना तिचे फोटो क्लिक करू नये म्हणून मनाई करतानाही व्हायरल व्हिडीओत दिसते. मात्र परिणीतीची ही कृती नेटकऱ्यांना पटलेली नाही.
परिणीतीचा हा व्हिडिओ पाहून एका नेटकऱ्याने कमेन्ट करत लिहिले की, ‘एवढा अॅटीट्यूड का दाखवत आहे’, तर आणखी एकाने कमेंट केली की, ‘नेत्याची बायको होणार आहे तर किती नखरे वाढले आहेत.’ दरम्यान, परिणीती चोप्रा लवकरच इम्तियाज अलीच्या ‘चमकिला’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.