नवी दिल्ली: करोना बधितांचा देशातील आकडा 15 लाखाच्या दारात जाऊन पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत 49 हजार 931 बाधितांची नोंद देशांत झाली. ही आजवरची सर्वात मोठी वाढ आहे.
त्याचवेळी या काळात करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या 708वर पोहोचली आहे. त्यामुळे देशातील मृतांची संख्या 708 वर पोहोचली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशांत चार लाख 85 हजार 114 सक्रिय बाधित आहेत. गेल्या 24 तासांत 31 हजार 991 बाधीत करोनामुक्त झाले आहेत. एकूण
करोनामुक्तांची संख्या सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नऊ लाख 17 हजार 568 होती. देशातील बरे होण्याचे प्रमाण 63.92 टक्के आहे.
करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येचा विचार करून सरकारने चाचण्यांची संख्या वाढवली आहे. आयसीएमआरने गेल्या 24 तासांत पाच लाख 15 हजारापेक्षा अधिक चाचण्या केल्या आहेत. एकूण एक कोटी 68 लाख सहा हजार 803 चाचण्या आतापर्यंत केल्या आहेत. सध्या देशांतील करोना चाचणी केंद्रांची संख्या 1310 आहे. त्यात 906 सरकारी तर 404 खासगी लॅबरोटरींचा समावेश आहे.