पुणे – सहकारी क्षेत्रामधील बॅंकिंग फ्रंटियर्स या नामांकित प्रकाशन संस्थेतर्फे सहकारी बॅंकांसाठी दरवर्षी विविध पुरस्कार घोषित केले जातात.
मोठया सहकारी बॅंकांकरिता असलेल्या “फ्रंटियर्स इन को.ऑपरेटीव्ह बॅंकिंग ऍवॉर्डस् 2021 – लिडरशीप कॅटेगरीमध्ये “आय.टी. हेड’ हा पुरस्कार या वर्षी कॉसमॉस बॅंकेच्या चिफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ऑफिसर, आरती -ढोले यांना जाहीर करण्यात आला.
सन्मानचिन्ह व प्रश्स्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप असून बॅंकींग फ्रंटियर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबू नायर यांनी या पुरस्काराची घोषणा केली.