मुंबई – सार्वभौम सुवर्ण रोखे योजना 2020- 21 मधील 11व्या शृंखलेतील सुवर्ण रोखे 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी 2019 या काळात जनतेला उपलब्ध होणार आहेत.
रोख्यातील सोन्याचे दर प्रति ग्रॅमला 4,912 रुपये इतका ठरविण्यात आला आहे. जे ग्राहक रोख्याची मागणी आणि पेमेंट डिजिटल स्वरूपात करतील त्यांना प्रति ग्रॅमला 50 रुपयाची सूट देण्यात येणार आहे. नागरीकांना प्रत्यक्ष सोने खरेदी न करता त्याना सोन्यातील खरेदीचा लाभ व्हावा या करीता सरकारने ही याजना सुरू केली आहे.
सोन्याच्या मागणीवर परिणाम
2020 मध्ये भारतातील सोन्याची मागणी 35 टक्क्यांनी कमी होऊन ती केवळ 446 टन इतकी झाली. लॉक डाऊनमुळे सोन्याच्या मागणीवर परिणाम झाला. त्याचबरोबर या काळात गुंतवणुकीसाठी सोन्याचा वापर वाढल्यामुळे सोन्याचे दर उच्च पातळीवर राहिले. आगामी काळात सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता असल्याचे जागतिक सुवर्ण परिषदेने म्हटले आहे.
गेल्या वर्षी भारतामध्ये सोन्याची मागणी 690 टन इतकी झाली होती. लॉक डाऊनच्या काळामध्ये लोकांचे दागिने खरेदीचे किंवा ते वापरण्याचे कमी झाले होते. या काळात विवाहाचे प्रमाणही कमी झाले होते. त्यामुळे सोन्याची मागणी मर्यादित राहिली, असे सुवर्ण परिषदेचे व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम पी आर यांनी सांगितले. जागतिक पातळीवर सरलेल्या वर्षात सोन्याची मागणी कमी राहिली.