Aaradhya Bachchan – अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान लेक आराध्याच्या धीरूभाई अंबानी शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात अॅश अभिषेक आणि अमिताभ बच्चन एकत्र दिसले होते. अशात सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ सर्वाधिक चर्चेत आलाय, हा व्हिडिओ आराध्या बच्चनचा आहे, आणि ती या व्हिडिओमध्ये अभिनय करत आहे. शाळेतील कार्यक्रमात आराध्याने परफॉर्म केले यादरम्यानचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, सोशल मीडियावर युजर्स संमिश्र प्रतिक्रिया देत आहे.
What a Superstar Presence n Performer she is Already and Why not!!!!!! Woahhh that Confidence..love love love ❤️
#AaradhyaBachchan @hasinimani coming for her 😍 pic.twitter.com/uWjUTA6Kxe— Ruth (@Ruth4ashab) December 15, 2023
या व्हिडिओमध्ये आराध्या रागात डायलॉग बोलताना दिसत आहे. व्हिडिओवर लोक प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले, “शेवटी आम्हाला आराध्याचे कपाळ बघायला मिळाले.” एकाने लिहिले, “ऐश्वर्याच्या आवाजात अमितजींची उंची आणि जया जीचा राग अभिषेक बच्चन.” एकाने लिहिले की, “तिचा अभिनय सुहाना खानपेक्षा खूपच चांगला आहे.”
एकाने लिहिले, “नुकत्याच लाँच झालेल्या NepoKids पेक्षा चांगले… अभिनयाचे पॉवरहाऊस.” दुसर्याने लिहिले, “शेवटी मी तिचे कपाळ पाहिले, आता मी शांतपणे मरू शकेन.” दुसरा म्हणाला, “ती तिचे केस उघडे ठेवून आणखी सुंदर दिसते. तिच्या कपाळावरून!” आणि ती किती शक्तिशाली अभिनेत्री आहे!” असं म्हणत युजर्स आता प्रतिक्रिया देत आहे.
दरम्यान, ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या अनेक चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगल्या आहे. मात्र येणे व्हिडिओ ऐश्वर्या राय – अभिषेकसह अमिताभ बच्चन एकत्र दिसले. त्यामुळे या जोडप्याच्या घटस्फोटाच्या बातम्यांना पूर्णविराम लागला आहे.