Israel-Hamas War : गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात कतारच्या एका वृत्तवाहिनीचा कॅमेरामन ठार झाला आहे. हल्ल्यात ठार झालेला व्हिडिओ पत्रकार समीर अबुदाका हा हल्ल्यापासून वाचण्यासाठी खान युनूस येथील फरहाना शाळेत त्याचा सहकारी वेल दहदौहसह गेला होता.
वृत्तवाहिनीने सांगितले की, “इस्रायलच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी कॅमेरामन समेर अबुदाका मारला गेला. त्याचा साथीदार वेल दहदौह गंभीर जखमी झाला. हे दोघेही वेढलेल्या भागातील एका शाळेतून रिपोर्टिंग करत होते. वेल धहदौहने त्याच्या हाताला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली होती त्यावेळी हॉस्पिटलच्या बेडवर झोपले असताना अचानक हल्ला झाला तेव्हा तो शाळेतून पळून गेला होता, त्याचा खूप रक्तस्त्राव होत होता. त्यांना काही अंतरावर रुग्णवाहिका दिसली. समेर अबुदाकाला 5 तास रक्तस्त्राव होत राहिला पण त्याला कोणतीही मदत मिळाली नाही आणि त्याचा मृत्यू झाल्याचे सांगत अल-जझिराने इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध केला आहे.
इस्रायली संरक्षण दलाने सांगितले की, गाझामधील ग्राउंड ऑपरेशन दरम्यान चुकून तीन ओलीस मारले गेले आहेत. युद्धादरम्यान इस्रायलच्या लष्कराने अशी बातमी दिली आहे, त्यानंतर आता इस्रायलमध्ये लष्करावरच प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
तीन ओलिसांच्या मृत्यूबद्दल लष्कराने दु:ख व्यक्त केले आहे. “आमच्या सैनिकांनी उत्तर गाझा येथील शेजैया येथे तीन ओलिसांना गोळ्या घातल्या,” असे लष्कराने सांगितले. तसेच,”हमासचे ओलिस समीर तलालका, 22, अलोन शमरीझ, 26 आणि योतम हैम, 28 यांना चुकून मारण्यात आले कारण ते सुरुवातीला आमच्यासाठी धोका असल्याचे दिसले.” त्यासोबतच ओलीसांचे मृतदेह इस्रायलला आणण्यात आले असून त्यांची ओळख पटली आहे.” असे लष्कराने सांगितले आहे. या अनावधानाने घडलेल्या घटनेबाबत इस्रायली लष्कराने सांगितले की, याची चौकशी केली जात आहे. लष्कराने मृत झालेल्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे.