चंदिगड – आम आदमी पक्षाचा पंजाबमधील मुख्यमंत्री पदाचा उमेदवार पुढील आठवड्यात जाहीर केला जाणार आहे, असे या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. राज्याचा मुख्यमंत्री शीख समाजाचा असेल, असे त्यांनी या आधीच जाहीर केले आहे.
त्यानुसार आम आदमी पक्षाचे लोकसभा सदस्य भगवंत मान हे या पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार ठरतील असे भाकित वर्तवले जात आहे. पंजाबात 14 फेब्रुवारीला विधानसभेची निवडणूक होत असून त्यात सत्तारूढ कॉंग्रेसला आम आदमी पक्ष हा चांगली टक्कर देईल असे वातावरण आहे.
या राज्यात भाजपचे अस्तित्व नाममात्र आहे आणि अकाली दल अजून पूर्ण ताकदीने या निवडणुकीच्या मैदानात उतरलेला नाही. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या राजकीय हालचालींकडे सगळ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करून निवडणूक लढवण्याचा निर्णय या पक्षाने घेतला आहे.