चंदीगड – पंजाब विधानसभेच्या अध्यक्षपदी आम आदमी पक्षाचे उमेदवार कुलतार सिंग संधवान यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. ते दोन वेळा विधानसभेचे सदस्य होते. संधवान यांच्या नावाचा प्रस्ताव मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोमवारी सभागृहात मांडला. तो लगेच एकमताने संमत झाला.
निवड होताच संधवान यांचे अभिनंदन विविध राजकीय पक्षांच्या आमदारांनी अभिनंदन करणारी भाषणे केली.संधवान यांचे अभिनंदन करणाऱ्या आमदारांमध्ये कॉंग्रेसचे आमदार तृप्त राजिंदर सिंग बाजवा, शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनप्रीत सिंग अयाली, भाजपचे आमदार अश्वनी शर्मा, कॉंग्रेसचे आमदार प्रताप सिंग बाजवा आणि सुखपाल सिंग खैरा यांचा समावेश होता.
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत संधवान यांनी कॉंग्रेसचे उमेदवार अजयपाल सिंग संधू यांचा 21,130 मतांच्या फरकाने पराभव करून कोटकपुरा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला.ते माजी राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांचे नातू आहेत. संधवान ‘आप’च्या शेतकरी शाखेचे अध्यक्ष राहिले आहेत आणि शेतीशी संबंधित मुद्दे सक्रियपणे मांडत आहेत.