बॉलीवूडमधील सुपरस्टार अभिनेता आमीर खानची मुलगी इरा खानचे लेटेस्ट फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. इराने नुकतेच फोटोशूट केले आहे, ज्यातील काही फोटो सोशल मीडियावर आपला जलवा दाखवित आहेत.
इराने नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवर आपले फोटो शेअर केले आहे.
ज्यात ती रेड आणि पर्पल कलरच्या बॅकलेस हाई स्टिल गाउनमध्ये झळकते. लाल रंगाच्या गाउनमध्ये इरा एका हाउस ट्रीजवळ उभी असताना खूपच हॉट लुकमध्ये दिसतेय. याशिवाय अन्य एका फोटोत इरा कॅमे-याकउे पाठ करत निसर्ग सौंदर्य निहाळताना, तर दुसऱ्या फोटोत एका लाकडी टेबलवर इराने झोपून पोज दिली आहे. हे फोटो शेअर करत इराने फोटो कॅप्शन लिहिली की, काय दृश्य आहेत. रुजबेहकडून करण्यात आलेली ही फोटोग्राफी.
View this post on Instagram
What a view… ? @photographybyroozbeh . . . #whataview #seasonsmumbai #shoot #photooftheday
दरम्यान, इरा अलीकडेच तिच्या थिएटर प्रोडक्शन युरीपिडिस मीडिया या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. युरीपिडिस मेडियाची कथा मेडियाच्या अवती-भोवती फिरत आहे. ज्यात तिचे पती जेसन हे तिला ग्रीक राजकन्या करिंथसाठी सोडून जातात. याचा बदला घेण्यासाठी ती जेसनच्या दुस-या पत्नी आणि आपल्या मुलाची हत्या करते आणि जीवनाची नवीन सुरूवात करण्यासाठी ऍथेसला रवाना होते.