#Foodiesकट्टा : कोक्‍कितामध्ये आखाड स्पेशल-फ्युजन फूड फेस्टिव्हल ….


हडपसरमधील खवैय्यांसाठी वर्ष 2013 साली कोक्‍किता गार्डन फॅमिली रेस्टॉरंट’ ची स्थापना झाली. गेल्या सहा वर्षांत कोक्‍किता’ने एक अशी वेगळी ओळख निर्माण केली की, आज प्रत्येकजण म्हणतो की, शब्दांपेक्षा जास्त परिणामकारकरित्या बोलते ती जीभेवरील चवीची भाषा…’ याचाच अनुभव सगळे खवैय्ये घेत आहेत कोक्‍किता’मध्ये.
वर्ष 2013-19 दरम्यान अनेक कार्पोरेट, फॅमिली कार्यक्रम हडपसरच्या कोक्‍किता’मध्ये झाले आणि दिवसेंदिवस कोक्‍किता’ची लोकप्रियता वाढतच गेली. आणि कोक्‍किता हा एक ब्रैंड निर्माण झाला.

खास मेनू

कोंकणी सागोटी चिकन 
वऱ्हाडी मटण 
चिकन डोंगरी 
कारवारी चिकन 
खरडा चिकन 
सावजी मटण 
कोल्हापुरी मटण 
बोंबील चटणी 
घिरोष्ट चिकन 
मटका बिर्याणी 
फिश मालवणी 
वगैरे वगैरे वगैरे.. 

म्हणूनच शनिवार दि. 13 जुलै ते गुरुवार दि. 1 ऑगस्ट दरम्यान, कोक्‍किता’ मध्ये आयोजित करण्यात आला आहे, आखाड महोत्सव”. व या आखाड महोत्सवामध्ये खवैय्यांसाठी खास वेगळा मेनू बनवण्याच्या उद्देशाने या आखाड महोत्सवची खासियत ही ऑथेंटिक नसून फ्युजन फूड फेस्टिवल’ अशी आहे.
प्रत्येकाच्या आवडी/निवड़ीनुसार नवीन व्हेज- नॉनव्हेज पदार्थ तयार करण्यात येणार आहे. अगदी मराठवाड्यापासून ते कोंकणापर्यंत आणि विदर्भापासून ते पश्‍चिम महाराष्ट्रापर्यंत सर्व व्हरायटीज एकाच ठिकाणी सर्व्ह केल्या जातील. आपण आपले मित्रमंडळी, नातेवाईक आणि कुटुंबीयांसह हडपसर गाडीतळाजवळच्या कोक्‍किता’च्या पार्किंगमध्ये आपली कार केव्हा पार्क करताय? आम्ही आपल्या सेवेत आहोतच, असे व्यवस्थापक विशाल म्हात्रे यांनी म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)