पुणे – बारावीच्या परीक्षेत इंग्रजीच्या पेपरला दोन तोतया विद्यार्थी बसल्याचे बीएमसीसी महाविद्यालयात शुक्रवारी उघडकीस आले. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी दोन तोतयांसह चौघांना अटक केली आहे.
दत्तात्रय भालेराव (20, रा.नानेकरवाडी), प्रसाद अशोक शिंदे (20, रा. नानेकरवाडी), अनिकेत अण्णासाहेब नानेकर (20, रा.नानेकरवाडी), शुभम लहू कदम (20, रा.भोसरी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.