आमदार चाबुकस्वार यांनी आयुक्तांना धरले धारेवर

संग्रहित छायाचित्र

प्रलंबित प्रश्‍नांवर बैठक; 22 विषयांवर चर्चा
पिंपरी  –
विधानसभा निवडणूक जवळ येताच आपल्या क्षेत्रातील प्रलंबित कामे उरकून घेण्याची लोकप्रतिनिधींची लगबग सुरू झाली आहे. पिंपरीचे आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांनी देखील महापालिका आयुक्‍त आणि अधिकाऱ्यांसोबत एक बैठक आयोजित करुन प्रलंबित कामे कधी पूर्ण करणार याचा कालावधी वदवून घेतला. वेगवेगळ्या 22 प्रश्‍नांवर आयुक्‍तांशी चर्चा करतानाच “आश्‍वासन नको, किती दिवसात काम करणार ते सांगा!’ असे म्हणत आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले

पालिकेच्या आयुक्‍त कार्यालयात ही बैठक पार पडली. यावेळी सहशहर अभियंता राजन पाटील यांच्यासह नगररचना, झोपडपट्टी पुनर्वसन, अतिक्रमण, स्थापत्य आदी विभागांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत पिंपरी भाजी मंडई, पिंपरी स्मशानभूमी ते सुभाषनगर डीपी रस्ता तयार करणे या प्रश्‍नी अनुक्रमे रस्ता व आरक्षणात बदल करणे, सुधारित विकास योजनेमध्ये 18.00 मीटर रूंद रस्त्याची आखणी प्रारूप आराखडयात करणे, असा तोडगा काढण्यात आला. रमाबाईनगर येथील इमारतींमधील लाभार्थ्यांना घर देण्याबाबत न्यायालयाने दिलेल्या स्थगितीबाबत येत्या 25 जुलै रोजी उच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)