कलंदर: आज की बात…

उत्तम पिंगळे

आंतरराष्ट्रीय…

अमेरिका चीन भांडती अपार
व्यापार युद्ध जाहिले की ।
आपापसांवर वाढवला कर
परिस्थिती होई जैसे थे की।।

सौदी तेलसंयंत्र लागले जळू
उत्पादन घटले अर्ध्यावरी ।
इंधनाचे दर वाढतील आता
लागणार झळा जगामाजी ।।

भारतास आता तेलाची चिंता
रुपया तो जाय खाली खाली।
आर्थिक विकास मंदावू पाहे
दुष्काळी तेरावा तेलासाठी ।।

पाकींनी चिंता स्वतःची करावी
काश्‍मीरा पाठी लागू नये ।
मूर्खासी ते कधी कळणार
कुत्र्याचे शेपूट वाकडे की।।

राष्ट्रीय…

काश्‍मीर प्रश्‍न पडे देशांमध्ये
कोर्टात याचिका जमा होती।
विरोधकां तो येई कळवळा
जो तो काश्‍मीरा जाऊ पाहे।।

वरुणाचा तोरा पूर्ण देशावर
समस्त भारता झोडपले की।
सर्वत्र हाहाकार दिसू पाहे
पाणीच पाणी चोहोकडे।।

मंदी आता डोकावत आहे
उपाय शोधणे क्रमप्राप्त ।
जीएसटी दर आढावा घ्यावा
सवलत आधार द्यावा तोची।।

बॅंका एकीकरण होत आहे
दृष्टिक्षेपी नफा होणे म्हणे।
एअर इंडियाचा पांढरा हत्ती
त्याचाही विचार करावा की।।

महाराष्ट्रीय…

महाराष्ट्रदेशी पावसाचा जोर
पूर तो मांडला सर्वत्र की।
पाऊस आता थांबाया हवा
जो तो साकडे घालू पाही।।

मेगाभरतीच्या महायात्रा येथे
खड्डारूप रस्त्याने जाऊ लागे।
उद्योगाची गाडी मंदावून जायी कोणत्याच पक्षी नसे तमा।।

पक्षांतरा येथे जोर तो भारी
पितृपक्षाचीही तमा नाही।
पितृपक्षी जर प्रवेश लांबला
कायमचा थांबला होऊ नये।।

बेकारी व मंदी दारी येई
चिंता नसे परी कोणा एका।
जो तो झेंडा आज बदलू पाहे
खुर्चीचा तो मेवा खाण्यासाठी।।

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here