नवी दिल्ली : राज्यात महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उद्या होणाऱ्या शपथविधीचे आमंत्रण देण्यासाठी उध्दव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. आघाडीला पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी सोनिया गांधी यांचे आभार मानले.
दरम्यान, शिवतीर्थावर उद्या सायंकाळी पावणे सातच्या सुमारास शपथविधी होईल. या सोहोळ्यासाठी सोनिया गांधी यांच्यासह तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिले आहे. दरम्यान पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे आपण शपथविधी सोहोळ्याला येऊ शकत नसल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कळवले आहे.