नवी दिल्ली – युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडियाने आता नागरिकांना त्यांच्या आधारकार्डावरील पत्त्यांमध्ये बदल करण्याची सुविधा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिली आहे. कुटुंबप्रमुखांच्या संमतीने हे काम आता ऑनलाइन करता येऊ शकणार आहे.
रेशनकार्ड, मार्कशीट, विवाह प्रमाणपत्र, पासपोर्ट इत्यादी नातेसंबंधांच्या कागदपत्रांचा पुरावा सादर केल्यानंतर अर्जदार आणि कुटुंबप्रमुखाचे नाव सादर केल्यानंतर ही प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. त्यानंतर अर्जदाराला ओटीपी दिला जाईल आणि त्यानंतर ही दुरुस्ती केली जाऊ शकणार आहे. ज्या अर्जदाराकडे नातेसंबंधांची कागदपत्रे नसतील तर अशा प्रकरणांमध्ये कुटुंबप्रमुखाने अर्जदाराच्या नावाने स्वयंघोषित प्रमाणपत्र (सेल्फ डिक्लरेशन) सादर करण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
.@UIDAI enables ‘Head of Family’ based online address update in Aadhaar
Residents can update address in Aadhaar online with the consent of their Head of Family
Read here: https://t.co/oHdNjzYrR3
— PIB India (@PIB_India) January 3, 2023
देशातील लक्षावधी नागरिक आपले राहण्याचे ठिकाण वारंवार बदलत असल्याने त्यांच्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरू शकणार आहे. पत्ता बदलण्यासाठीची सध्या जी सुविधा उपलब्ध आहे त्या व्यतिरिक्त ही जादाची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन पत्ते अपडेट करण्यासाठी नागरिक माय आधार पोर्टलला भेट देऊ शकतात.