वाठार स्टेशन, (प्रतिनिधी) – भाडळे, ता. कोरेगाव येथे कार आणि मोटारसायकल (एमएच-11-एएच-8387) यांची काल (दि. 19) रात्री 9.30 च्या सुमारास धडक होऊन, मोटारसायकलवरील सखाराम विठ्ठल मदने (वय 27, रा. भाडळे) हा जागीच ठार झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी मंगळवारी (दि. 19) रात्री 9.30 च्या सुमारास कार क्रमांक (एमएच-11-सीडब्ल्यू-9277) ही वाठार स्टेशनहून डिस्कळ बाजूकडे जात होती. त्यावेळी सखाराम मदने हे चिलेवाडीहून मोटारसायकल (एमएच-11-एएच-8387) वरून भाडळेकडे निघाले होते. भाडळे येथील चौकात दोन्ही वाहनांची जोराची धडक झाली.
या अपघातात सखाराम मदने यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात झाली असून, हवालदार उदय जाधव तपास करत आहेत.