पुणे, दि. 29 –भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार प्राध्यापक महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी सिंहगड रस्ता भागात घडली. वृषाली तुषार थिटे (वय 38, रा. सुदत्त संकुल, शिंदे मैदानाजवळ, वडगाव बुद्रुक) असे मृत्युमुखी पडलेल्या प्राध्यापक महिलेचे नाव आहे. अपघातानंतर डंपरचालक पसार झाला असून, त्याच्या विरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डंपरचालक घटनास्थळी डंपर सोडून पसार झाला असून, पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला आहे, अशी माहिती सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संख्ये यांनी दिली.