परिणिती चोप्रा सध्या कारगिलमध्ये “उंचाई’ या आपल्या आगामी सिनेमाचे शूटिंग करते आहे. इथे प्रचंड थंडी आहे. 12 अंश तापमानात शूटिंग करायला लागत असल्याचे तिने सोशल मीडियावरच्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
या फोटोमध्ये तिने ब्लॅक वुलन जॅकेट, स्नो बूट आणि ब्लॅक पॅन्ट घातल्याचे दिसते आहे. या ठिकाणी एवढी थंडी आहे की पाण्याच्या बाटलीतील पाण्याचाही बर्फ झाला आहे. चहा पिताना लोकांच्या दाढीला लागलेल्या चहाचाही बर्फ झाला. कॅमेराही फ्रीज झाला आणि इथली नदीही गोठली आहे, असे परिणितीने म्हटले आहे.
कारगिलपूर्वी परिणिती शूटिंगसाठी नेपाळला गेली होती. तिथे 13 हजार फूट उंचीवर परिणितीने शूटिंगचे पहिले शेड्युल पूर्ण केले आहे. “उंचाई’ व्यतिरिक्त परिणिती “ऍनिमल’मध्येही दिसणार आहे.
अलीकडेच परिणितीच्या एका फॅनने तिची फिरकी घेतली. रणवीर सिंह पप्पा बनला असे तिला कोणीतरी चॅटिंगदरम्यान सांगितले. तिला ही गोष्ट खरीच वाटली. तिने लगेचच रणवीर सिंहला टॅग करून या बातमीची खातरजमा करायचा प्रयत्न केला.
रणवीरने तिला काय उत्तर दिले हे मात्र समजू शकलेले नाही. रणवीर सिंह आणि परिणितीने “लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ आणि “किल दिल’मध्ये एकत्र काम केले आहे.