नगर (प्रतिनिधी) – पैशाच्या व्यवहारातून झालेल्या वादात एकावर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी रात्री १० च्या सुमारास शेंडी बायपास वरील वडगाव गुप्ता शिवारात डॊंगरेवस्ती जवळ घडली.
या खुनी हल्ल्यात अशोक श्रीधर शेळके (वय ६०, रा. वडगाव गुप्ता) हे गंभीर जखमी झाले आहेत. निखील शिवाजी गांगर्डे, (रा. वडगाव गुप्ता) याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्नान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तुषार अशोक शेळके ( वय-२०, रा. वडगाव गुप्ता, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
यातील संशयीत आरोपी गांगर्डे याने अशोक शेळके यांना पैशाच्या व्यवहारातून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने गांगर्डे याने त्याच्याकडील असलेल्या चाकूने शेळके यांच्या पोटावर वार करून गंभीर जखमी केले.
याबाबत बुधवारी (दि.१६) रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी हे या घटनेचा तपास करत आहेत.