सीडनी – तब्बल १२० वर्षांपासून बेपत्ता असलेल्या एका जहाजाचा शोध लागल्याचा दावा करण्यात आला आहे. एसएस नेमेसिस हे जहाज १९०४ साली मेलबर्नला कोळसा पुरवणार होते. मात्र न्यू साऊथ वेल्सजवळ वादळामध्ये अडकल्यानंतर हे जहाज ३२ कर्मचार्यांसह बेपत्ता झाले होते.
या कर्मचार्यांचे मृतदेह आणि जहाजावरील लाकडी सामानाचे तुकडे काही आठवड्यांनंतर वहात किनार्यापर्यंत आले होते. मात्र तरी या जहाजाचे काय झाले, याचे गूढ मात्र कायम राहिले होते. सबसी प्रोफेशनल्स मरीन सर्व्हिसेस या कंपनीने या बेपत्ता झालेल्या जहाजाचे अवशेष शोधून काढले आहेत.
सीडनीच्या किनार्याजवळ समुद्रात ५२५ फूट खोलीवर हे जहाज आढळून आले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जहाजाचे काहीही नुकसान झाले नव्हते. हे जहाज एसएस नेमेसिस या मालवाहू जहाजाचे असल्याची शंका आह.
मात्र त्याचे खात्रीशीर पुरावे अजून मिळालेले नाहीत. या जहाजाच्या व्हिडीओच्या आधारे त्याचे ३ डी मॉडेल तयार केले जात आहे. त्या मॉडेलची एसएस नेमेसिसबरोबर पडताळणी केली जाणार आहे.
एसएस नेमेसिस बेपत्ता झाल्यावर सुमारे ४० कर्मचारी देखील बेपत्ता झाले होते. त्यांच्या वारसांना आपल्या पूर्वजांच्या अचानक बेपत्ता होण्यामागील गूढ उलगडण्यास आता मदत होऊ शकेल.