पुणे – टायनी टेल्स निर्मित, सर्जनशाळा आणि भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र प्रस्तूत, ‘आलोर गान’ या नाटकाचा पुण्यातील शुभारंभाचा प्रयोग आहे. साधारणपणे १ तास चालणारा हा प्रयोग दिनांक १९ नोव्हेंबर, गुरूनानक जयंतीदिवशी, दुपारी १२:३० वाजता: एस.एम.जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे येथे संपन्न होणार आहे.
गेले अनेक महिने करोनामुळे बंद असलेल्या नाट्यप्रयोगांना यानिमित्ताने पुन्हा सुरूवात होणार आहे. आलोरगान हे बंगाली लोककथेवर आधारित नाटक आहे. आलोरगान हा मुळ बंगाली शब्द आहे, याचा अर्थ ‘प्रकाशाचं गाणं’. अगदी नावाप्रमाणेच या नाटकात सुंदरबनाची कथा संगीतातून उलगडत जाते.
या कथेचे नाट्यरूपांतरण आणि दिग्दर्शन प्रतिक्षा खासनीस यांनी केले आहे. साधारणपणे ५० मिनीटांच्या या प्रयोगात विविध भागातलं लोकसंगीत, लोकवाद्यही वापरण्यात आली आहेत.
तसेच महाराष्ट्रातील तमाशा, तसेच बंगालमधीलही काही लोककलाप्रकारांचा समावेश यामध्ये केला आहे. आवाज, शरीर, संगीत याचा वेगळ्या पध्दतीने वापर असलेला हा प्रयोग आहे.
टायनी टेल्स ही संस्था गेले ३ वर्ष सातत्याने पुस्तकं, गोष्टी नाटकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत, त्यांच्या जागेत गावागावात फिरून नाटक पोहोचवण्याचा प्रयत्न करते.
ते स्वतः तुम्ही बोलवाल त्या ठिकाणी येऊन नाटक करतात.
त्यांच्या या नाटकाला आम्हाला स्टेज, लाईट्स, मोठ्या जागा असं काही लागतच असं नाही एखाद्या झाडाखाली, अंगणात, शाळेच्या वर्गात असं कुठेही हे नाटक उभं राहू शकतं.