मुंबई : जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये खराब जेवण दिल्याची तक्रार ग्राहकाने केल्यांनतर भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने विक्रेत्याला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
11 जानेवारी रोजा ग्राहकाने खराब जेवण दिल्याची तक्रार केली होती. दादर ते गोवा जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये नास्ता करण्यासाठी खराब ब्रेड विक्रेत्याने ग्राहकाला दिला होता. ग्राहकाने दिलेल्या तक्रारीची दाखल घेऊन रेल्वेने विक्रेत्याला एक लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे.