दहशतवाद्याशी संबंध : अती वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्याची चौकशी

श्रीनगर : जम्मू काश्‍मिर पोलिसांचा जिल्हा पोलिस प्रमुख दविंदर सिंग याला अटक होऊन काही दिवस होता न होतात तोच आणखी एक अती वरीष्ठ पोलिस अधिकारी दहशतवाद्यांशी संबंधित असल्याच्या संशयावरून पोलिसांच्या रडारवर आला आहे. हा पोलिस अधिकारी दविंदरसिंग याच्यासह दहशतवाद्यांना मदत करण्याच्या घटनेत सहभागी होता,असे समजते.

अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाचा अधिकारी असलेल्या या संशयितास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दविंदर सिंग प्रकरणाचा तपास गुंडाळण्याच्या प्रयत्नात हा अधिकारी होता. त्याची दखल घेत त्याची चौकशी करण्यात येत आहे.

खंडणीच्या आरोपाखाली या अधिकाऱ्याला यापुर्वी निलंबित केले होते. खंडणीचे पैसे स्वीकारल्याचा त्याच्यावर गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा तपास करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.