शिल्पा शेट्टीचा मुलगा वियान याचा काल 9 वा वाढदिवस होता. तिने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर त्याच्यासाठी एक मस्त गिफ्टही दिले आहे. शिल्पा आणि राज कुंद्रा यांच्या घरात कालच्या दिवशी एक नवीन पाहुणा आला आहे.
View this post on Instagram
हा पाहुणा म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही, तर चक्क एक कुत्र्याचे पिल्लू आहे. हे पिल्लू वियानला भेट देत असतानाचा एक व्हिडिओ शिल्पाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हे वियानसाठी एक सरप्राईज होते. वियानला डोळे बंद करायला सांगितले होते आणि शिल्पाने कुत्र्याचे पिल्लू वियानच्या हातात सोपवले.
View this post on Instagram
वियान हे कुत्र्याचे पिल्लू बघून अगदी हरखूनच गेला होता. शिल्पाने या कुत्र्याच्या पिलाचे नाव “ट्रफल’ असे ठेवले आहे. वियानने आणखी एक कुत्र्याचे पिल्लू मागितले आहे. मात्र 10 व्या वाढदिवशी त्याला हे गिफ्ट मिळेल, असे आश्वासन आपण त्याला दिले असल्याचे शिल्पाने सांगितले.
View this post on Instagram
वियानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिल्पाने वियानच्या चौथ्या वाढदिवसाच्या वेळचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. गेल्याच वर्षी शिल्पाने एका कन्येला जन्म दिला आहे आणि तिचे नाव समिषा ठेवण्यात आले आहे.