मुंबई– ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान या आपल्या ग्लॅमरस भूमिकांसाठी प्रसिद्ध होत्या. अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आहे. 80 च्या दशकात झीनत अमान यांनी त्यांच्या अभिनयाने आणि सौंदर्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या झीनत सोशल मीडियावर सक्रीय असतात. अनेक स्टाईलिश फोटो त्या शेअर करत असतात. नुकताच त्यांनी शेअर केलेल्या फोटोशूटवरून त्या चर्चेत आल्या आहेत.
झीनत अमान यांनी त्यांच्या क्लासी लूकमधील फोटो इनस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यातील त्यांचा लुक अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. यावेळी झीनत अमान यांनी ब्लॅक ड्रेस परिधान केल्याचे दिसते. तर गळ्यात मोत्यांची माळ आणि डोळ्यांवर गॉगल अशा लूकमध्ये त्या दिसत आहे. सध्या त्यांच्या फोटोवर लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. याआधी देखील झीनत यांनी त्यांचे हटके लुकमधील फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, झीनत अमान यांनी सत्यम शिवम सुंदरम, डॉन, हरे रामा हरे कृष्णा, कुर्बानी, लावारिस, दोस्ताना आणि धर्म वीर या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो. या चित्रपटातील त्यांचा बोल्ड लुक विशेष चर्चेत आला होता.