इंदोर – मध्य प्रदेशातील दमोह येथील एका खासगी शाळेवर मोठा आरोप करण्यात आला आहे. शाळेतील हिंदू विद्यार्थिनींच्या म्हणण्यानुसार, त्यांना हिजाब घालण्याची सक्ती केली जात आहे.
ही बाब समोर येताच,’हिंदू संघटना सक्रिय झाल्या आणि पोलिसांकडे तक्रार करण्यात आली, त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. इतकेच नाही तर गोंधळ घालत हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून ठिय्या आंदोलन केले. या शाळेची नोंदणी रद्द करावी, अशी त्यांची मागणी आहे.’
आता या प्रकरणी भोपाळचे शालेय शिक्षण मंत्री इंदर सिंह परमार यांचे वक्तव्य आले आहे. शाळेचा गणवेश हा तपासाचा विषय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिक्षण विभागाच्या नियमानुसार गणवेश ठरवण्याचा अधिकार खासगी शाळांना आहे. याबाबत पालकांनी आक्षेप नोंदविल्यास कारवाई केली जाईल. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार कारवाई केली जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे.