मुंबई – तुम्हाला माहित आहे का ? की ऐश्वर्या राय बच्चन देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे? एका मासिकानुसार, ऐश्वर्याने संपत्तीच्या बाबतीत बॉलिवूडच्या नायिकांसह दक्षिणेतील ३ टॉप अभिनेत्रींना मागे टाकले आहे.
बॉलीवूडमध्ये नेहमीच अशी चर्चा आहे की हिरोइन्सना हिरोपेक्षा कमी मानधन दिले जाते. हिरो हिरोईनच्या फीमध्ये मोठी तफावत आहे. मात्र काही, अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता अभिनेत्री केवळ ब्लॉकबस्टर चित्रपटच करत नाहीत, तर चांगली कमाईही करत आहेत.
चित्रपटांव्यतिरिक्त, नायिका ब्रँड एंडोर्समेंट आणि इतर व्यवसायातून भरपूर कमाई करत आहेत. तुम्हाला माहिती आहे का सध्या भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण आहे? दक्षिणेपासून ते बॉलीवूडपर्यंत कोणत्या अभिनेत्रीकडे सर्वाधिक संपत्ती आहे? ‘लाइफस्टाइल एशिया’ने सांगितले आहे सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण आहे ?
ऐश्वर्या राय बच्चन ही भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. तिची एकूण संपत्ती 828 कोटी रुपये आहे. एवढेच नाही तर ऐश्वर्याची गणना बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. ती एका चित्रपटासाठी 10 कोटी रुपये मानधन घेते. नुकतीच ऐश्वर्या ‘पोनियिन सेल्वन 2’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटासाठी त्याने 10 कोटी रुपये फी देखील घेतली होती.
प्रियांका चोप्रा आज ग्लोबल स्टार बनली आहे. ती केवळ अभिनेत्रीच नाही तर गायिका आणि बिझनेसवुमन देखील आहे. प्रियांकाची एकूण संपत्ती 580 कोटी रुपये आहे. प्रियांकाचे न्यूयॉर्कमध्ये एक रेस्टॉरंटही आहे. याशिवाय प्रियांका चोप्रा जोनासनेही काही कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.
रिपोर्टनुसार, आलिया भट्टची एकूण संपत्ती 557 कोटी रुपये आहे. आलियाने 2012 मध्ये करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अल्पावधीतच आलिया बॉलिवूडच्या टॉप हिरोइन्सपैकी एक बनली. माहितीनुसार, आलिया एका चित्रपटासाठी 10 ते 15 कोटी रुपये फी घेते.
करीना कपूर खान ही देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती बर्याच ब्रँड्सचे समर्थन करते, ज्यातून ती खूप कमाई करते. करिनाची सध्याची एकूण संपत्ती 440 कोटी रुपये आहे.
अनुष्का शर्माची एकूण संपत्ती 255 कोटी रुपये आहे. अनुष्का सुद्धा ब्रँड्स एंडोर्स करून करोडो रुपये कमवते. तिच्याकडे ‘नुश’ नावाचा कपड्यांचा ब्रँड देखील आहे, ज्याचे बाजार मूल्य 65 कोटी रुपये आहे.
माधुरी दीक्षितची एकूण संपत्ती २४८ कोटी रुपये आहे. देशातील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. माधुरी स्वतःची ऑनलाइन डान्स स्कूल देखील चालवते. माधुरी एंडोर्समेंटमधूनही भरपूर कमाई करते.
कतरिना कैफची सध्याची संपत्ती 217 कोटी रुपये आहे. कतरिना एका चित्रपटासाठी 10-12 कोटी घेते. ती ब्रँड एंडोर्समेंटसाठी 6-7 कोटी रुपये घेते.
साऊथ सिनेसृष्टीतील लेडी सुपरस्टार म्हटली जाणारी नयनतारा ही देशातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यांची एकूण संपत्ती 165 कोटी रुपये आहे. नयनतारा लवकरच ‘जवान’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती एका चित्रपटासाठी 7 ते 8 कोटी रुपये घेते.
‘बाहुबली’ स्टार अनुष्का शेट्टीची एकूण संपत्ती सध्या 120 कोटी रुपये आहे. अनुष्का शेट्टी एक ट्रेंड योग प्रशिक्षक देखील आहे. अनुष्का शेट्टी एका चित्रपटासाठी ६ कोटी रुपये मानधन घेते.
भारतातील श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत साऊथ स्टार समंथा रुथ प्रभूचेही नाव आहे. त्यांची एकूण संपत्ती सध्या ८९ कोटी रुपये आहे.