मुंबई – आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मोठी सून श्लोका दुसऱ्यांदा आई झाली.
श्लोकाने आकाश अंबानीच्या मुलीला जन्म दिला आहे. आकाश अंबानी आणि श्लोक मेहता यांचा विवाह मार्च 2019 मध्ये झाला होता. लग्नानंतर सुमारे दीड वर्षांनी डिसेंबर २०२० मध्ये श्लोकाने आकाशच्या मुलाला जन्म दिला. पृथ्वी अंबानी हा आकाश आणि श्लोका यांचा मुलगा आहे. तर वेदा आकाश अंबानी असं मुलीचं गोंडस नाव ठेवलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. वेदपुराणानुसार सध्या नावांचा ट्रेंड चालू आहे. वेदाच्या नावाचा अर्थ आणि अन्य वेदपुराणांमधील नाव आहे. सत्, चित् आणि आनंद असे ब्रह्माचे स्वरूप असल्याचे वेदांमध्ये म्हटले आहे
श्लोकाने एप्रिलमध्ये नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) च्या उद्घाटन समारंभात तिच्या दुसऱ्या गर्भधारणेची घोषणा केली होती. त्यावेळी श्लोकाने एका सुंदर ड्रेसमध्ये तिचा बेबी बंप फ्लॉंट केला होता.
श्लोका संपूर्ण कुटुंबासह सिद्धिविनायक मंदिरात गेली मुलीला जन्म देण्याच्या सुमारे आठवडाभरापूर्वी श्लोका पती आकाश अंबानी, सासरे मुकेश अंबानी आणि मुलगा पृथ्वीसह सिद्धिविनायक मंदिरात गणेशाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते.