नवी दिल्ली : चीनसह जगभरातील करोनाचा संसर्ग रोजच वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची RT-PCR चाचणी करण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. तसेच चीन, जपान, कोरिया आणि थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंगही केले जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी वाढत्या करोनाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर माहिती दिली. त्यानुसार, चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य असेल. विमानतळावर या प्रवाशांमध्ये कोविड 19 ची लक्षणे आढळल्यास किंवा कोविड चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास प्रवाशांना क्वारंटाईन केले जाईल, अशी माहिती मांडविया यांनी दिली आहे.
RT-PCR test to be mandatory for international arrivals from China, Japan, S. Korea, Hong Kong & Thailand. On arrival, if any passenger from these countries is found symptomatic or tests positive for Covid19, then he/she will be put under quarantine: Union Health Min Dr Mandaviya pic.twitter.com/QOXNnu0LRV
— ANI (@ANI) December 24, 2022
तर दुसरीकडे भारतात आज 201 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. यासह देशात आतापर्यंत करोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 4 कोटी 46 लाखांच्या पार गेली आहे. देशात सध्या 3,397 सक्रिय करोना रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी नवीन आकडेवारी जारी केली आहे. तसेच देशात आतापर्यंत पाच लाखांहून अधिक करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जगभरात सध्या करोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसत आहे. भारतातही ओमायक्रॉनच्या BF.7 व्हेरियंटचे चार रुग्ण आढल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. काही राज्यांनी मास्कसक्ती लागू केली आहे.