मुंबई – साऊथचा प्रसिद्ध अभिनेता धनुषने आपल्यासाठी चेन्नईमध्ये एक आलिशान घर खरेदी केले आहे. याबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर धनुषच्या नव्या लूकचीही जोरदार चर्चा सुरु झाली. नुकतंच धनुषचा ‘वाथी’ हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे.
चेन्नईच्या पोस गार्डनमध्ये बांधलेले हे घर धनुषने त्याच्या आई-वडिलांना भेट दिले आहे.दिग्दर्शक सुब्रमण्यम सिवा यांनी धनुषच्या नवीन घराबद्दल माहिती देत नव्या घराचे काही फोटो देखील पोस्ट केले आहेत. यानंतर हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये धनुष त्याच्या आई-वडिलांसोबत आहे आणि खूप आनंदी दिसत आहे. निळ्या रंगाचा कुर्ता आणि लांब केसांसह दाढीमध्ये अभिनेत्याचा हा लूक चर्चेचा विषय ठरत आहे. नवीन घरासाठी चाहते देखील त्याचे अभिनंदन करत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार या आलिशान घराची किंमत 150 कोटी आहे.
தம்பி தனுஷின்
புதிய வீடு
கோவில் உணர்வு
எனக்கு😊வாழும் போதே
தாய்,தந்தையை
சொர்கத்தில் வாழ
வைக்கும் பிள்ளைகள்,
தெய்வமாக
உணர படுகிறார்கள்😊மேலும்,
தன் பிள்ளைகளுக்கும்,
மற்றவர்களுக்கும்,
எடுத்துகாட்டாகவும்,
உதாரணமாகவும்,
உயர்ந்து விடுகிறார்கள்..💕வாழ்க தம்பி,❤️🙏🏻@dhanushkraja pic.twitter.com/kGBywHfr6c
— Subramaniam Siva Dir (@DirectorShiva_) February 18, 2023
धनुष त्याच्या पुढील चित्रपटासाठी अरुण माथेस्वरनसोबत ‘कॅप्टन मिलर’साठी शूटिंग करत आहे. या चित्रपटात धनुष, प्रियंका अरुल मोहन आणि शिव राजकुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. धनुषने त्याचा पुढचा चित्रपटही दिग्दर्शक शेखर कममुलासोबत साइन केला आहे. याशिवाय, तो आगामी ‘D50 चित्रपटात देखील झळकणार आहे.