स्वदेशी बनावटीची ‘धनुष’ तोफ भारतीय लष्करात दाखल

जबलपूर – धनुष ही स्वदेशी बनावटीची तोफ आज भारतीय लष्करात दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय लष्कराच्या तोफखान्याची ताकद वाढणार आहे. जबलपूर येथील शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यात धनुष या तोफेची निर्मिती करण्यात आली असून, सध्या ६ तोफा लष्करात भरती करण्यात येणार आहेत. तर आगामी काळात अशा ११४ धनुष तोफांची निर्मिती करून ती लष्करात दाखल करण्यात येणार आहे.

धनुष ही तोफ बोफोर्स पेक्षाही सरस आहे. बोफोर्स या तोफेची मारक क्षमता ही ९ ते ३० किलोमीटर पर्यंत आहे, तर धनुष या तोफेची मारक क्षमता ४० किलोमीटर पर्यंत आहे. धनुष ही तोफ संपूर्ण स्वदेशी बनावटीची असून कोणत्याही वातावरणात सलग मारा करू शकते. बोफोर्स प्रमाणेच धनुषला देखील १५५ mm कॅलिबरची गन बसविण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर आणि राजस्थानच्या भारतीय सीमेवर ही तैनात करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.