– शिवशंकर निरगुडे
हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील बोरखेडी पिनगाळे येथील धोंडीराम चव्हाण यांचा मुलगा MBBS साठी पात्र झाला आहे. अरविंद चव्हाण यांचे शिक्षण पुणे येथे झाले आहे. एका शेतकऱ्याचा मुलगा अनंत अडचणींचा सामना करून एमबीबीएस झाल्याने बोरखेडी परिसरात त्याचे कौतुक केले जात आहे.
सेनगाव तालुक्यातील बोरखेडी पिनगाळे येथील धोंडीराम चव्हाण यांच्या कडे पाच एकर शेती आहे. शेतात काही उत्पन्न होत नव्हते मुलांची शिक्षण देखिल होत नव्हते त्यामुळे ते गाव सोडून पुणे येथे रहायला गेले. धोंडीराम चव्हान यांनी पुणे येथे जाऊन माळी काम करून मुलांना शिकवले आणि मुलांनी देखिल त्याची जान ठेवत आज त्यांचा एक मोठा मुलगा प्रवीण चव्हाण MCA इंजिनियर आहे.
तर दुसरा मुलगा अरविंद चव्हाण MBBS पात्र झाला आहे. दि 29/11/2022 रोजी गौवरमेंट कॉलेज नंदुरबार येथे त्याचा नंबर लागला आहे. वडिलांचे स्वप्न मुलांनी पूर्ण केले आहे त्यामुळे आता सर्वच स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे.