कोथरुड(प्रतिनिधी) – लॉक डाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या बांधकाम साईटवरील मजूर, हॉटेल्समध्ये कामे करणारे अनेक कामगार, साईटवर काम करणारे वॉचमन, सोसायटी रखवालदार, पडद्यामागील सिने कलावंत, कलाकार,सफाई कामगार व अशा अनेकांना बांधकाम क्षेत्रातील बढेकर ग्रुप च्या वतीने मदतीचा हात देण्यात येत आहे. मागील तीस दिवसांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून गरजुंपर्यंत मदत पोहचवली जात आहे.
या अडचणीच्या काळात गरीब लोकांना एक वेळेचे अन्न मिळेल की नाही याची भ्रांत होती. ही परिस्थिती ओळखून कोथरूड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रवीण बढेकर यांनी बढेकर ग्रुप च्या माध्यमातून आपली सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना आधार दिला आहे. एक महिन्याचे अन्नधान्ये, किराणामालाच्या वस्तूंची मदत १८०० कुटुंबांपर्यंत पोहचवली आहे. तसेच,२०० लोकांना मास्क वाटप, अनेक जेष्ठ व्यक्तींना औषधांची घरपोच मदत, विविध सोसायटीमधे, रस्त्यावर औषध फवारणी करिता लागणारी विविध औषधे, इतर साहित्य तसेच कर्तव्याकामी दक्ष असलेल्या अनेक पोलिसांना जेवणाचे डबे , मास्क पुरवले गेले आहेत. बढेकर ग्रुप” कडून पुण्या बरोबरच अहमदनगर, जळगाव हे जिल्हे व आंबेगाव, फलटण या तालुक्यातील असंख्य गरजू लोकांना मदतीचा हात दिला जात आहे.
ज्याप्रमाणे असंख्य विटा रचून भिंत तयार होते.आणि या भिंतीतून घर साकारते.त्याप्रमाणे या समाजोपयोगी कामात अनेक लोकांचे सहकार्य व योगदानातून ही सत्कार्याची, माणुसकीची भिंत उभारली गेली आहे. आपणही समाजाचे काही देणं लागतो या भावनेतून ” बढेकर ग्रुप” यापुढेही गरजू लोकांना मदतीचे कार्य अखंडितपणे करत राहणार असल्याचे बढेकर ग्रुपचे चेअरमन प्रविण बढेकर यांनी सांगितले.