नगर -करानाच्या पार्श्वभूमीवर माणूस-माणसापासून लांब असला तरी यासाठी वाघोली (ता. शेवगाव) शेतकऱ्यांनी एक पाऊल पुढे टाकत एक पाऊल माणसातील देवाकडे या उपक्रमा अंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथील 1 हजार 200 कार्मचाऱ्यांना मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, प्रांजली सोनवणे आदींची भेट घेतली व उपक्रमाची माहिती दिली. यामध्ये सरपंच बाबासाहेब गाडगे, उपरसरपंच बापू चितळकर, उमेश भालसिंग, दादासाहेब जगदाळे, रावसाहेब शिंगटे, संभाजी आगलावे, बलभीम जगधडे, संतोष पवार, वैभव भालसिंग, किशोर भालसिंग, अजित भालसिंग, योगेश भालसिंग आदी उपस्थित होते.