मुंबई – क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वयाच्या सोहळ्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोरदार पदार्पण करणाऱ्या मास्टर ब्लास्टर ‘सचिन तेंडुलकर’चा क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेल्या वानखेडे स्टेडियमवर पुतळा उभारण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने हा निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष अमोल काळे यांनी एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेला दिली आहे.
येत्या वन डे वर्ल्ड कपदरम्यान या पुतळ्याचं अनावरण पार पडेल. 14 नोव्हेंबर 2013 ला वानखेडे स्टेडियमवरच सचिन तेंडुलकरने आपली अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच खेळली होती. वानखेडे स्टेडियमवर सध्या सचिन तेंडुलकरच्या नावाने एक प्रेक्षक गॅलरी आहे. आता याच स्टेडियमवर मास्टर ब्लास्टरचा भव्य पुतळा देखील उभारण्यात येणार आहे.
सचिनच्या 50 व्या वाढदिवशी या पुतळ्याचे अनावरण केले जाणार असून, मुंबई क्रिकेट असोसिएशनन कडून सचिनसाठी ही कौतुकाची भेट असले. असं देखील अमोल काळे यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, सचिन तेंडुलकरने एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावली असून,
अनेक सर्वाधिक विक्रम सचिनच्या नावे आहेत. सचिनने 14 नोव्हेंबर 2013 रोजी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना त्याने वानखेडे स्टेडियमवर खेळला होता. यावेळी त्याने आपल्या गुरुजनांपासून ते क्रिकेटमधील सहकाऱ्यांपर्यंत सर्वांचे आभार मानले.