मुंबई – मंत्रालयात आज एका राजकिय नेत्याच्या मोटारीखाली लाल्या नावाच्या एका कुत्र्यांचा चिरडून दुर्देवी मृत्यू झाला. पोलिसांचा लळा लागलेल्या या कुत्र्याच्या मृत्यूमुळे पोलिसांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मंत्रालयाच्या परिसरात व मंत्रालायच्या इमारतीमध्ये काही भटक्या कुत्र्यांचे वास्तव्य आहे.
पोलिसांची या कुत्र्यांशी मैत्री झाली आहे. रात्रीच्यावेळी या कुत्र्यांची पोलिसांना मोठी मदत होते. रात्रीच्या वेळेस आत कोणत्याही अनोळखी व्यक्तीने मंत्रालयाच्या आत घुसण्याचा प्रयत्न केला तर हे कुत्रे भुंकतात. अशाच एका लाल्या नावाच्या कुत्र्याचा कोल्हापूरच्या एका बड्या नेत्यांच्या आलिशान गाडीखाली चिरडून मृत्यू झाला. या अपघाताची कोणतीही नोंद झाली नसल्याचे समजते.