#व्हिडीओ : शेषात्मज रथावर दगडूशेठ गणपतीची मिरवणूक

पुणे – दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीला आज सकाळी साडेआठ वाजता प्रारंभ झाला. गणेशाची प्राणप्रतिष्ठा सकाळी करण्यात आली आहे. प्राणप्रतिष्ठेपूर्वी श्रींची मूर्ती मुख्य मंदिरातून वाजतगाजत मिरवणुक उत्सव मंडपात नेण्यात आली.

प्रथेप्रमाणे आज सकाळी साडेआठ वाजता मंदिरामध्ये गणपतीची आरती करण्यात आली आणि मिरवणुकीला प्रारंभ झाला. फुलांनी सजवलेल्या शेषात्मज गणेश रथावर श्रींना विराजमान करण्यात आले होते. मिरवणुकीच्या अग्रभागी गायकवाड आणि देवळणकर बंधू यांचे सनई-नगारा पथक, पुण्यातील सुप्रसिद्ध प्रभात, दरबार आणि मयूर बँड यांची पथके आणि गंधाक्ष ढोल-लेझीम पथक आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×