नवी दिल्ली – आपल्या छायाचित्रात बदल करून वेबसाईटवर अपलोड करून त्रास देण्याचा आणि मुस्लिम महिलांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची तक्रार एका महिला पत्राकराने पोलिसांत शनिवारी दाखल केली. त्यानंतर उजव्या विचारसरणीच्या कडव्या कार्यकर्त्यांकडून ही वर्षभरात दुसऱ्यांदा घडलेली घटना असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.
त्याची दखल घेत या ऍपवर बंदी घालण्यात येईल आणि त्याचा समन्वयाने तापस करण्यात येईल, असे ट्विट माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी रात्री उशीरा केले.
एका ऑनलाईन न्यूज पोर्टलला काम करणाऱ्या या महिलेने या प्रकरणात गुन्हा तातडीने नोंदवावा, अशी मागणी केली आहे.
समाज माध्यमे आणि इंटरनेटवर मुस्लिम महिलांना त्रास देण्याचा आणि त्यांचा अवमान करणाऱ्या व्यक्ती समुहावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बुलीबाई डॉट गितहब डॉट आयओ या वेबसाईटवर माझा फोटो पाहून सकाळी मला धक्काच बसला. त्यावर माझे छायाचित्र अयोग्य स्वरूपात, अस्वीकारार्ह रुपात आणि अत्यंत चुकीच्या पध्दतीने वापरले होते. या मागे मी आणि माझ्या सारख्या स्वतंत्र आणि पत्रकार महिलांना त्रास देण्याच हेतू स्पष्टपणे दिसतो, असे या फिर्यादीत म्हटले आहे.
या ट्विटच्या स्नॅपशॉटसह अन्य ट्विटचा स्नॅपशॉट फिर्यादीसह जोडण्यात आला आहे. बुली बाय ही हा शब्द आणि या साईटवरील मजकूर हा मुस्लिम महिलांचा अपमान करणारा आहे, या ट्विटला प्ररिसाद देत दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत असल्याचे उत्तर दिले आहे. संबंधित अधिकाऱ्याला योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे, असे त्यात म्हटले आहे.