वाठार स्टेशन(प्रतिनिधी)- रस्त्यावर विनाकारण विनामास्क फिरणाऱ्या सात जणांवर भाडळे येथील एसटी स्टँड चौकात वाठार स्टेशन पोलिसांनी कारवाई केली. वाठार पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार भाडळे ता. कोरेगाव येथील सुशांत आप्पासो घोरपडे रा. हासेवाडी, जितेंद्र चंद्रकांत पवार रा. हासेवाडी, बाळू मारुती कुंभार रा.हिवरे, सुरज आबासो माने रा. होलेवाडी, संतोष बाबासो बिचुकले रा. धनगरवाडी, प्रतिक देशमुख रा.कवडेवाडी, शिवाजी पांडुरंग ठोंबरे रा. कवडेवाडी हे सात जण करोना ग्राम सुरक्षा समितीला भाडळे येथील एसटी स्टँड चौकात मास्क न लावता फिरत असताना मिळून आले.
समितीने त्यांना 500 रुपये दंड ग्रामपंचायतीत भरण्यासाठी सांगितले असता या सात जणांनी आम्ही दंड भरणार नाही तुम्हाला काय कारवाई करायची ती करा. असे सांगून निघून गेले. ग्राम सुरक्षा समितीने वाठार पोलिसात माहिती दिली. वाठारचे सपोनी स्वप्नील घोंगडे यांनी त्यांच्यावर 79/2020 भादवी कलम 269,270 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.