शिरूर :’लॉकडाऊन’च्या काळात शिरूर पोलीस ठाण्यात 340 जणांवर दाखल करण्यात आले आहे. याबाबत शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊन’च्या काळात शिरूर शहरात व शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने कडक कारवाईचे सत्र सुरू आहे.
तसेच काही दुकानदारांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. आपत्कालीन व्यवस्थापन भा द वि 188 प्रमाणे 340 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच मुंबई दारूबंदी कायदा अंतर्गत कलम 65 ( इ)प्रमाणे 39 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या काळात नियम मोडून विनाकारण मोटारसायकलवर फिरणार्या 27 दुचाकी चालकांवर कारवाई करून दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
तर तीन चार चाकी वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. शिरूर शहरात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या 24 जणांना लॉकडाऊन काळामध्ये तडीपार केले असल्याचेही निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सांगितले. शिरूर शहरात व शिरूर तालुक्यात शिरूर पोलीस स्टेशनचे अधिकारी पोलीस आपले कर्तव्य बजावत असून ठिकाणी नागरिकांना कोरोनाव्हायरस आजाराबद्दल जनजागृती करून नागरिकांनी बाहेर पडू नये याबाबत मार्गदर्शन करीत आहेत.