बेल्हे – मंगरुळ (ता. जुन्नर) येथील कोरडे मळ्यात राहणाऱ्या संतोष सुखदेव कोरडे यांच्या गोठ्यात मंगळवार (दि. 10) रात्री तीनच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून दीड वर्षाच्या कालवडीचा जागीच फडशा पाडला.
संतोष सुखदेव कोरडे हे शेतात राहतात. त्यांच्या गोठ्यात बांधलेली कालवडीशेजारी उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने जागीच ठार केली. हल्ल्यात कोरडे यांचे 15 ते 16 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.