इंडोनेशिया जवळच्या बेटावर मोठा भूकंप

जाकार्ता – इंडोनेशिया जवळच्या अम्बोन बेटावर आज सकाळी स्थानिक प्रमाणवेळेनुसार 11 वाजून 53 मिनीटांनी भूकंपचा मोठा झटका बसला. या धक्‍क्‍याची तीव्रता 7.3 रिश्‍टर स्केल इतकी होती. अमेरिकेच्या जिओलॉजिक सर्व्हेच्या भूकंप मापन यंत्रातही याची नोंद झाली आहे.

तथापी भूगभर्गाखाली तब्बल 208 किमी अंतरावर या भूकंपाचा केंद्र बिंदू असल्याने त्यातून सुनामीची आपत्ती उद्‌भवण्याची शक्‍यता नाही असेही या संस्थेने म्हटले आहे. पॅसिफीक सुनामी इशारा केंद्रावरही या भूकंपाची नोंद झाली असली तरी त्यांनीही या भुकंपामुळे इंडोनेशियाजवळील समुद्रात सुनामी निर्माण होण्याची शक्‍यता नाही असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान या भुकंपामुळे इंडोनेशियात कोठे हानी झाल्याचे मात्र वृत्त नाही. हा भाग अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात भुकंपप्रवण झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.