इराणच्या विरोधात व्यापक जागतिक आघाडी करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न

विदेश मंत्री माईक पॉम्पओ मध्यपुर्वेच्या दौऱ्यावर

वॉशिंग्टन – इराणच्या विरोधात व्यापक जागतिक आघाडी करण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून सुरू असून याच प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांचे विदेश मंत्री माईक पॉम्पेओ हे मध्यपुर्वेतील देशांच्या दौऱ्यावर गेले आहेत.ते सौदी अरब अमिरात, संयुक्त अरब अमिरात या देशांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहोत. त्यांनी म्हटले आहे की इराणच्या विरोधात सर्वच देशांची आता मोठी आघाडी होण्याची गरज असून त्यासाठी आम्ही अशियाई आणि युरोपिय देशांबरोबरही चर्चा करीत आहोत.

इराणने सरकार पुरस्कृत जो दहशतवाद माजवला आहे त्याच्या विरोधात आघाडी करण्याचा आमचा इरादा आहे असे त्यांनी म्हटले आहे. सध्या इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धसदृश तणाव निर्माण झाला आहे त्या पार्श्‍वभूमीवर इराणवरील कारवाईसाठी अमेरिका जगातील अन्य देशांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान त्याचवेळेला अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी म्हटले आहे की सध्याचा तणाव निवळण्यासाठी इराणशी विनाअट चर्चा करण्याची अमेरिकेची तयारी आहे. तथापी त्यांच्या या प्रस्तावाला अजून इराणने पाठिंबा दिलेला नाही.

एकीकडे इराणला चर्चेच्या टेबलावर आणण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसरीकडे इराण जर बधलाच नाही तर थेट त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी जगातल्या अन्य देशांचा पाठिंबा मिळवायचा असे दुहेरी धोरण सध्या अमेरिकेने राबवलेले दिसते आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन हे सध्या इस्त्रायलच्या दौऱ्यावर असून त्यांनी रविवारी इराणला इशारा देताना म्हटले आहे की अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याचा आपला इशारा मागे घेतला असला तरी ती अमेरिकेची कमजोरी असल्याचे इराणने मानू नये. आम्ही इराणच्या विरोधात लष्करी कारवाईचा पर्याय कायम ठेवला आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.