कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने चांगलं यश मिळवल. मात्र भाजपचे अनेक नेते पक्ष सोडून पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होत आहेत. भाजपला एकापाठोपाठ एक धक्के मिळत असताना पश्चिम बंगालमध्ये आता काँग्रेसला देखील मोठा धक्का बसला आहे.
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे सुपुत्र अभिजित मुखर्जी यांनी सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अभिजीत मुखर्जी यांनी वडील प्रणब मुखर्जी यांच्या जंगीपूर लोकसभा मतदार संघाचे दोनदा नेतृत्त्व केले. परंतु 2019 साली ते या मतदारसंघातून पराभूत झाले आहे.
Former President Pranab Mukherjee’s son Abhijit Mukherjee joins Trinamool Congress in Kolkata pic.twitter.com/LVLPdzpVCt
— ANI (@ANI) July 5, 2021
गेल्या काही वर्षात काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यात ज्योतिरादित्य सिंधिया, जितिन प्रसाद, हिमंत बिस्वा सरमा सारख्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. आता अभिजीत मुखर्जी यांनीही काँग्रेसला सोडचिट्ठी दिली. परंतु प्रणब मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी आजही काँग्रेस पक्षाच्या सदस्या आहेत.