विसगाव खोरे(प्रतिनिधी) – पुणे जिल्ह्यात रोज कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांची गैरसोय होते. या रुग्णांबरोबर आलेल्या नातेवाईकांचे हाल होतात. अशा रुग्णांची सोय व्हावी म्हणून महाराष्ट्र शासन व पुणे जिल्हा परिषदेमार्फत कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी कर्मचारी राज्य निगम अस्पताल, बिबवेवाडी, पुणे यांनी ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी 100 बेडचे रुग्णालय उभारले आहे.
या 100 बेडपैकी १२ बेड हे अतिदक्षता विभाग व ८८ बेड ऑक्सीजन सुविधेसह अत्याधुनिक सोयीसुविधासह रुग्णालय तयार करून जिल्हा प्रशासनास उपलब्ध करून दिले आहे. जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभागाकडील जिल्हा आरोग्य सोसायटीद्वारे सदर केंद्र कार्यान्वित करून वैद्यकीय सेवा व औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या रुग्णालयास इतर सुविधांची आवश्यकता भासल्यास जि.प.पुणे मार्फत सर्वतोपरी सहकार्य करणेत येणार आहे.
माननीय नामदार दिलीप वळसे-पाटील सो मंत्री उत्पादनशुल्क व कामगार विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या विशेष प्रयत्नातून निर्मिती करण्यात आली आहे. सदर कोविड केंद्राचे 100 बेड रुग्ण क्षमता असून सदर रुग्णालयाचे उद्घाटन आज दिनांक25 जुलै 2020 मा. गिरीश बापट सो खासदार पुणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.याप्रसंगी मा. दीपक म्हैसेकर विभागीय आयुक्त पुणे विभाग, निर्मलाताई सुखदेव पानसरे अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे, नवल किशोर राम जिल्हाधिकारी पुणे, श्रीमती माधुरीताई मिसाळ आमदार पर्वती विधानसभा, आयुष प्रसाद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे, रणजीतदादा शिवतरे उपाध्यक्ष जिल्हा परिषद पुणे, प्रमोदकाका काकडे (सभापती बांधकाम व आरोग्य) उपस्थित होते.
डॉ. नांदापूरकर जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. सुनील जोडेमेडिकल सुपरिटेंडेंट इएसआयसी, भारत शेंडगे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे, डॉ. भगवान पवार जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. यादव प्रशांत शिर्के गटविकास अधिकारी पंचायत समिती हवेली हे अधिकारी वरील कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या रुग्णालयाचा उपयोग ग्रामीण भागातील कोविड रुग्णांना होईल अशी माहिती रणजीत शिवतरे उपाध्यक्ष जि.प. पुणे यांनी दिली,