पाटण -ढेरुगडेवाडी(येराड), ता. पाटण येथील दत्तात्रय लक्ष्मण सपकाळ यांच्या राहत्या घराबाहेर संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एक 10 फूट लांबीचा अजगर दिसताच त्यांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी तात्काळ ही गोष्ट तेथील स्थानिक सर्पमित्र गणेश सपकाळ, निखील मोहिते व वन्यजीव विभागाच्या आधिकाऱ्यांनी अजगराला सुखरूप पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आले.
यावेळी विकास माने, वनरक्षक चवरे, वनपाल जाधव वनरक्षक अतुल खोत उपस्थित होते. यावेळी कोणताही साप अथवा जखमी पक्षी व वन्यजीव मनुष्यवस्तीजवळ आढळला तर तात्काळ जवळच्या वनविभागाला किंवा सर्पमित्रांना कळवा असे आवाहन सर्पमित्र विकास माने यांनी केले आहे.