पुणे : दिवसभरात 228 पॉझिटिव्ह

पुणे -दिवसभरात 228 करोनाबाधितांची नोंद झाली. 356 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 22 करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, त्यातील 6 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

करोनाबाधितांची संख्या सध्या कमी-अधिक होत आहे. मात्र, ती 200च्या आसपासच आहे. अद्याप पूर्णपणे कमी झालेली नाही.

सध्या, 481 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 275 रुग्ण व्हेन्टिलेटरवर उपचार घेत आहेत. शहरात एकूण बाधितांची संख्या 1 लाख 62 हजार 647 आहे.

डिस्चार्ज दिलेले रुग्ण 1 लाख 52 हजार 841 आहेत. तर ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या 5497 आहे. एकूण मृत्युमुखी पडलेले 4309 रुग्ण आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.