पुणे : शहरात गेल्या आठ महिन्यांपासून थैमान घालणाऱ्या करोनामुळे सप्टेंबरच्या मध्यापर्यंत थैमान घालणाऱ्या करोनाच्या साथीमुळे शासकीय तसेच खासगी रूग्णालयाची आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली होती. या कालावधीत शहरातील सक्रीय बाधित रूग्णांचा आकडा 22 हजारांपर्यंत गेल्याने करोना रूग्णांना आवश्यक असलेले बेडही मिळणे कठीण झाले होते.
मात्र, दोन आठवडयांपासून करोना रूग्णांची संख्या घटण्यास सुरूवात झाल्याने करोना रूग्णांवरील उपचारासाठीचे तब्बल 12 हजार 834 बेड रिकामे आहेत. त्यात, सुमारे 211 व्हेंटीलेटर तर 2482 ऑक्सिजन बेडचा समावेश आहे. तर ससून रूग्णालयात तब्बल 77 व्हेंटीलेटर रिकामे आहेत.
शहरात 9 मार्च रोजी करोनाचा पहीला रूग्ण सापडला. त्यानंतर आज अखेर पर्यंत एकूण 1 लाख 61 हजार 844 पर्यंत गेला आहे. त्यात, सुमारे 4 हजार 259 जणांचा मृत्यु झाला आहे. तर सुमारे 1 लाख 51 हजार 889 जण या आजारातून बरे झाले आहेत. या साथीने जुलै आणि ऑगस्ट आणि स्पटेंबर महिन्यात शहरात थैमान घातले होते. या कालावधीत शहरात तब्बल 22 हजारहून अधिक सक्रीय बाधित होते. या रूग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेकडून 84 खासगी हॉस्पीटलचे बेड ताब्यात घेतले होते.तसेच ससूनसह महापालिकेचीही 9 रूग्णालये होती.
या सर्व रूग्णालयांच्या तब्बल 15 हजार 417 खाटांची सुविधा सज्ज ठेवली होती. त्या, खाटांवर आज अखेर केवळ 2583 रूग्ण उपचार घेत असून 12 हजार 834 खाटा रिकाम्या आहे. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून अहोरात्र करोनाशी सामना करणाऱ्या आरोग्य यंत्रणेला ऐन सणासुदीत मोठा दिलासा मिळाला आहे.
ससून मधील 74 व्हेंटीलेटर रिकामे
महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या आठ महिन्यात पहिल्यादांच ससून मधील ऑक्सिजन ते व्हेंटीलेटर बेड रिकामे आहेत. करोना रूग्णांवरील उपचारासाठी ससून मध्ये 510 बेडची सुविधा आहे. त्यात 382 ऑक्सिजनचे 18 ऑक्सिननची सुविधा नसलेले आयसीयू बेड तसेच 110 व्हेटीलेटरचे बेड आहेत. त्यात, ऑक्सिजनची सुविधा असलेले 334 बेड रिकामे असून 11 आयसीयू बेड तर तब्बल 74 व्हेंटीलेटर बेड रिकामे आहेत. करोनाच्या काळात खासगी रूग्णालयात उपचार परवडत नसल्याने ससून रूग्णायलावर मोठा ताण आला होता. तर त्या ठिकाणी वेळेवर बेड न मिळाल्याने अनेक रूग्णांना जीव गमवावा लागला होता. मात्र, आता हेच ससून रूग्णालय रिकामे पडल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे.