बेंगळूरु – कर्नाटकमध्ये स्थानिक युवकांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी कर्नाटक सरकार लवकरच कन्नड भाषा चाचणी घ्यायला सुरुवात करणार आहे. ‘कन्नड भाषा कौशल्य परीक्षा’ असे या चाचणीचे नाव असणार आहे. स्थानिक नोकऱ्या अथवा शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात येणर आहे.
केंद्र सरकारने ज्याप्रमाणे ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीची पदभरती करण्यासाठी ज्याप्रमाणे राष्ट्रीय पात्रता चाचणी (एनईटी) घ्यायला सुरुवात केली आहे, त्याच धर्तीवर या कन्नड भाषा कौशल्य परीक्षेचे स्वरुप आधारलेले असणार आहे.
कन्नड भाषा ज्यांना येते आहे, त्यांना नोकऱ्यांची संधी मिळावी, याच हेतूने ही परीक्षा घेण्याची कल्पना आहे, भूमिपुत्रांना नोकऱ्यांची संधी डावलली जाऊ नये या बरोबरच कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांमधील संवाद अधिक चांगला संवाद व्हावा, हा देखील हेतू या परीक्षांमागे असेल, असे कन्नड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष टी. एस. नागाभरण यांनी सांगितले.
कायदा करण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळ यावर सविस्तर विचार करेल, असे कन्नड मंत्री सी. टी. रवी यांनी सांगितले.