पुणे – पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम पाषाणकर यांच्या बेपत्ता होण्याला बुधवारी एक वेगळे वळण लागले. त्यांचा मुलगा कपिल पाषाणकर याने शहरातील एका बड्या राजकीय नेत्याने त्यांचे अपहरण केले असल्याची संशय व्यक्त केला आहे.
त्याने यासंदर्भात पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेत रात्री उशीरा धाव घेतली. त्याच्या तक्रारी संदर्भात युनिट एक कडून दखल घेतली गेली. रात्री उशीरा पर्यंत यासंदर्भात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.
पाषाणकर हे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता झाले आहेत. यासंदर्भात वित्त पुरवठा करणाऱ्या काही व्यक्तींची शिवाजीनगर पोलिसांनी चौकशीही केली होती. दरम्यान पाषाणकर यांचा मुलगा कपील याने संशयीत राजकीय व्यक्तीचे नाव पोलिसांना काही दिवसांपुर्वीच सांगितले होते. मात्र पोलिसांनी संबंधीत राजकीय व्यक्ती मागील तीन दिवसांपासून मंत्रालयात बसूल आहे ?
यामुळे त्याची चौकशी करत आली नसल्याचे सांगत गुन्हा नोंदवला नसल्याचे सांगितले. मात्र कपिल पाषाणकर लेखी तक्रार दाखल करण्यासाठी रात्री उशीरा पोलिस आयुक्तालयात दाखल झाले. त्यांनी संबंधीत राजकीय व्यक्तीने नाव सांगण्यास मात्र नकार दिला. तर दुसरीकडे पोलिसांनीही यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्याशिवाय कोणतीच माहिती देता येणार नसल्याचे सांगितले.
संबधीत राजकीय व्यक्तीचे नाव संशयीत म्हणून सांगण्यात आले आहे. यामुळे राजकीय व्यक्तीकडे चौकशी केल्याशिवाय त्याचे नाव उघड करणे योग्य होणार नसल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.